Tv9 मराठी न्यूज चॅनेल मध्ये आय टी विभागात काम करणारे रोशन डायस, राहणार वसई यांचे आज निधन झाले आहे.. त्यांची कोरोना चाचणी Positve आली होती... हा मेसेज बुधवार दिवसभर फिरतोय!

रोशन आज आपल्यात नाही! त्याचं जाणं सर्वाना अस्वस्थ करतय!रोशन डायस टिव्ही 9चा आयटी विभागातील कर्मचारी!

आजारी असताना कामावर यायला लावणे, नोकरी जाण्याची धमकी देणे. असा प्रकार याचेबाबतीत घडला! इतरही कर्मचारी भयभीत आहेत! 

व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत हे कोविड19 तज्ञ आहेत का? हा मोठा प्रश्न! 

इतर११ कर्मचारी हाँटेलच्या दोन रुममधे (म्हणे)क्वारंनटाईन केले होते. 

त्यांची तपासणीही उशीरा झाली. मात्र रोशन आपण आजारी आहोत ,माझीही टेस्ट करा सांगत होते,तर मग 'तुझ्यात काही लक्षणं नाहीत, तपासणीची गरज नाही' असं दूरून फोनवरुन सांगून यांनी झिडकारून दिलं. 

बरं नाही तर कामावर येऊ शकत नाहीअशी विनंती त्याने केली, तरी व्य.संपादक ताठ! 

इनपुटहेड देशमुखांशी बोला! नाही आलात तर नोकरी जाईल, अशी धमकीही दिली! 

नोकरी जाईल, दोन बछड्यांना मोठं करायचय, या विचाराने रोशन कामावर येत राहिले. ही सगळी माहिती चँनलमधील बहुतेकांना  आहे! 

दोन दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस साजरा केला, तो अखेरचा! 

बुधवारी रोशन गेल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली! 

पाँझिटिव होता असं कळतं! 

गुरुवारी त्यांचा रिपोर्ट येईल! 

गाववाले, पत्रकार लक्ष्य ठेवून आहेत! सत्य समोर येईलच! 

पदाचा माज आणि रॅकेट करून  राजकारण करणारे सगळीकडे असतात पण या परिस्थितीत इतका जीवघेणा अट्टाहास कशासाठी? 

हा सवाल आहेच! 

चँनलमधे कामावर येउ लागलेले अनेकजण अस्वस्थ आहेत! 

रोशनबरोबर असणारे दोघेजण प्रचंड तणावाखाली आहेत! 

मुली टेन्शन मधे! 

मात्र इतक झाल्यावर व्य. संपादक व टिम (उमेश, निखिला, मोहन) साधी सहानुभूती तरी व्यक्त करणार की नाही? 

घरात दडून लोकांना पत्रकारितेचे डोस द्यायचे! धमक्या द्यायच्या.हे कोणत्या नीतिमूल्यात व माणुसकीत बसतं? 

याचं उत्तर अपेक्षित नाहीच! 

पण रोशन च्या  गुन्हेगारांना त्वरीत शासन होणे आवश्यक आहे. 

...काळ सोकावतोय!  मायबाप सरकार, याची चौकशी व्हावी! 

टिव्ही 9मधील जीवघेणा खेळ थांबवा! उचित कारवाई करा!

चँनलचे वरिष्ठही याची गंभीर दखल घेतील असं एकूण वातावरण आहे! पद आज आहे, उद्या नाहीत मात्र याचा वापर हत्यारासारखा करण्याची सवय झाली की तो सराईत गुंड होतो! 

पेशा कोणता का असेना पण गुंडशाही भयंकर विनायक! प्रसार माध्यमातील ही गुंडगिधाडशाही संपायलाच हवी!

(कुणीतरी बोलण भाग होतं) 


शीतल करदेकर 

अध्यक्ष 

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post