युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) 2019 चा निकाल लागला आहे.  यामध्ये एकूण 829 उमेदवारांची निवड झाली आहे.  परीक्षेत प्रथम आणि द्वितीय कोण आला याबद्दल लोकांना उत्सुकता लागली आहे.  म्हणूनच आम्ही  खास तुमच्यासाठी यूपीएससी 2019 च्या टॉपर्सची माहिती आणली आहे. (2019 UPSC Topper ) (Top 10 UPSC candidate in 2019)

 चला त्यांच्याबद्दल एकत्र जाणून घेऊया.

1. प्रदीप सिंग

यूपीएससी 2019 च्या परीक्षेत एका शेतकर्याचा मुलगा प्रदीप सिंग अव्वल आला आहे.  तो हरियाणाचा आहे आणि सध्या तो भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करत आहे.

२. जतीन किशोर


 या परीक्षेत जतिन किशोरने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.  जतिन हा दिल्लीचा रहिवासी असून भारतीय आर्थिक सेवा (IES) च्या प्रशिक्षणात असताना त्याने ही परीक्षा दिली.  ते सध्या ग्रामविकास मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत.

3. प्रतिभा वर्मा

 उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या प्रतिभा वर्मा यांनी या परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविला आहे.  त्यांनी महिलां मध्ये प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.  2014 साली त्यांनी आयआयटी दिल्लीमधून (IIT Delhi) पदवी घेतली.  लहानपणापासूनच तिला IAS अधिकारी व्हायचे होते.

4. हिमांशु जैन 

 
फरीदाबाद येथील रहिवासी हिमांशु जैनने चौथा क्रमांक मिळविला आहे.  दुसर्‍या प्रयत्नात त्याने ही परीक्षा दिली पास केली आहे.  हिमांशुने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.

5. जयदेव सी.एस. 


National Law School Of India University (NLSIU)  पदवीधर असलेले जयदेव सीएस त्यांनी 5 वा क्रमांक मिळविला आहे.  तो कर्नाटकचा आहे.

6. विशाखा यादव


 विशाखा यादव युनियन लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत सहावा क्रमांक मिळविणारी सॉफ्टवेअर अभियंता आहे.  तिसर्‍या प्रयत्नात तीने ही परिक्षा पास केली.  विशाखाचे वडील दिल्ली पोलिसात आहेत.

7. गणेश कुमार भास्कर

 

 या परीक्षेत तामिळनाडू येथील रहिवासी गणेश कुमार भास्करने 7 वा क्रमांक मिळविला आहे.  त्यांनी आयआयटी कानपूर येथून बी. टेक केले तो सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CSE) चा राज्यात अव्वल आला आहे.

8. अभिषेक सराफ

 

 भोपाळ येथील रहिवासी अभिषेक सराफ यांनी यूपीएससी -2019च्या. परीक्षेत 8  वा क्रमांक मिळविला आहे.  त्यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.  अभिषेक सध्या सहायक आयुक्त (IRS) आहे.


9. रवी जैन

 

 झारखंड  येथील देवघर चे  रहिवासी असलेले रवि जैन यांनी यूपीएससी - 2019 च्या परीक्षेत 9 वा क्रमांक मिळविला आहे.  त्यांनी दिल्लीच्या नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठातून अभियांत्रिकी केली आहे.  सध्या रवि जैन बिहारमधील जमुई जिल्ह्यात विक्री कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

10. संजीता मोहपात्रा 


ओडिशाच्या राउरकेला येथे राहणार्या संजीता महापात्राने या परीक्षेत दहावा क्रमांक मिळविला आहे.  तिने  अभियांत्रिकी चे शिक्षण घेतले आहे.  सध्या ती आपल्या पतीसमवेत मुंबईत राहते.  तिचा नवरा आरबीआयमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post