बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ (Republic TV) चा मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आधारीत सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे!  रामू यांनी स्वत: च ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

(Ram Gopal varma makin movie On Arnab Goswami)

आता तुम्हाला  वाटत असेल की अर्णबने कोणते असे तीर मारलेत कि, राम गोपाल वर्मा यांच्यासारख्या चित्रपट निर्मात्याने त्याच्यावर चित्रपट बनवावा.  यामागील कारण तुम्हाला सांगतो.

 त्याच झाल अस् की, सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल अर्णव गोस्वामीने गेल्या 1 महिन्यापासून बॉलिवूड स्टार्सविरूद्ध मोहीम सुरू केली आहे.  दरम्यान, तो त्याच्या डीबेट मध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना बोलवतो आहे आणि सुशांतच्या मृत्यूसाठी महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी आणि आदित्य चोप्राला दोष देत आहे.

(Arnab The News Prostitute)

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले की, 

"'माझ्या नवीन चित्रपटाचे शीर्षक असेल ' अर्णब - द न्यूज प्रॉस्टीट्युट '!  खुप अभ्यासानंतर शेवटी मी असा निष्कर्ष काढला आहे की त्याची टॅगलाइन 'द न्यूज पिंप' किंवा 'द न्यूज प्रॉस्टीट्युट' असावी.  दोघांचे अर्थ एकच असले तरी 'द न्यूज प्रॉस्टीट्युट' मला अधिक चांगले वाटते .
 
(the news Pimp)"

यानंतर रामगोपाल वर्मा यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले की, 

"'माझा आदित्य चोप्रा, करण जोहर, महेश भट्ट, शाहरुख खान, सलमान खान आणि इतर सर्वांना माझा सल्ला आहे की, म्हणजे फक्त चित्रपटांमध्ये नायक बणने  पुरेसे नाही.  आता हे महत्वाचे आहे की अर्णब गोस्वामी यांच्यासारख्या लोकांविरूद्ध आवाज उठविला पाहिजे. '"

(Arnab Goswami on sonia Gandhi)

तुम्हाला सांगु ईच्छीतो की, अर्णब ने काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनीया गांधी ह्याच्यावर ही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. दोन दिवसापुर्वी अशीच काहीशी टीका त्या महारष्ट्राचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शिवसेनेवर ही केली होती.

(Arnab Goswami on uddhav Thakrey)

अर्णब गोस्वामी आपल्या लाईव्ह डीबेट मध्ये पाहुणे तर बोलवतो पण त्यांना एकही शब्द बोसु देत नाही. स्वत:च स्वत:च्या डीबेट मध्ये गोंधळ घालत बसतो. स्वत:च केस यशस्वी पणे सॉल्व करतो (असं त्याला वाटत) स्वत:ला सुप्रिम कोर्ट समजुन केस निकाली काढत असतो. 

असो अर्णब ला लवकर सद्बुध्दी यावो हीच ईच्छा !

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post