____________________________________________   _प्रवीण तरडे गणपती प्रकरण धार्मिक OBC ना संविधानाच्या विरोधात उभे करण्याचा संघी अजेंडा आहे.

_____________________________________________


जोतीराव फूल्यांच्या काळात SC ST OBC लोकांना गणपती बसवणे तर दूरच परंतु त्याला स्पर्श करणे सुद्धा आलाऊड नव्हते .ही देवता केवळ ब्राम्हणदेवता होती .त्यामुळे जोतिरावांनी त्यांच्या लिखाणात गणपतीवर प्रचंड झोड उठवली.तुम्हाला हा प्रश्न कधी पडत नाही का की गणपतीवर,परशुरामावर प्रचंड टीका करूनही सर्व मराठा बहुजन जोतीरावांच्या समर्थनात का उभा राहिला ?  याच एकच कारण आहे की जोतीरावांच्या काळात गणपती मराठा बहुजनांची देवता नव्हती. 


जोतिरावांनी शिवजयंती सुरू केली व शिव जन्मोत्सव मोठा झाला. यामुळे जोतीरावांच्या आंदोलनाला प्रचंड जनसमर्थन मिळाले .याला काउंटर करण्यासाठी बांग टिळक यांनी ब्राम्हणाच्या घरातला गणपती obc च्या घरात व सार्वजनिक जीवनात प्रस्थापित केला .आज गणपती मुस्लिम ख्रिश्चन व बौद्ध सोडता सर्व बहुजन लोकांच्या घरात आहे व गणपती लोक देवता बनली आहे .

 


आमचे लोक धर्मीक आहेत .त्यांना धर्माच्या नावाने मरायला किंवा मारायला तयार करता येते.संविधानाच्या पुस्तकावर गणपती बसवला तर शीघ्र प्रतिक्रिया महाराष्ट्रीय ट्रेडिशनल आंबेडकराईट लोक यावर काहीतरी प्रतिक्रिया देतील व त्या प्रतिक्रियेनंतर OBC चे जनमत काय बनेल याचे कॅलक्यूलेशन करून हा प्रकार केला गेला आहे .


या प्रकरणात आणि मागील बौद्ध मराठी नटाने गणपती बसवण्याच्या प्रकरणात काही गोष्टी घट्ट होतात .

धार्मिक OBC जास्तच धार्मिक होतात कारण हा काळ धार्मिक वतावरणांने भारलेला असतो . देव कि संविधान असा अतार्कीक  पर्याय निवडीणासाठी मराठा-कुणबी , ओबीसी आणि SC , ST मधील गणपती ला मानणाऱ्या सर्व जातींसमोर ठेवला जातो. देवाला मानणारे देवाच्या बाजूने एकवटतात आणि ब्राम्हणांचे समर्थक बनतात  आणि संविधानाला  मानणारे एकटे बाजूला पडतात. आणि अशाप्रकारे ब्राह्मण ब्राह्मणेतर असा हक्क अधिकाराच्या मुद्द्यावर संघर्ष होण्याऐवजी आस्तिक आणि नास्तिक असा संघर्ष सुरु होतो. बौद्ध लोक संविधानाचे समर्थन करतात व देवाचा विरोध करतात म्हणून OBC व बौधेत्तर SC संविधानाचा विरोध करतात व संविधानाची पायमल्ली होताना बौद्ध कितीही बोंबलत असले व त्यामुळे बौधेत्तर SC ST व OBC यांचे कितीही हक्क अधिकार नष्ट होत असले तरी ते बौद्ध लोकांचे समर्थन करत नाहीत . कारण लोकांची आस्था धर्म आणि देवांशी जुडलेली आहे आणि याबाबतीता बहुजनांना तीव्र संवेदनशील बनविण्यात आलेले आहे. मागे जेव्हा दिल्ली येथे ब्राह्मणांद्वारे  संविधान जाळण्यात आले तेव्हा अजागृत कोणत्याही हिंदूनी या घटनेचा निषेध वा विरोध केला नाही तो याच ध्रुवीकरणाने


आमच्या गणपतीच्या मूर्तीखाली ठेवल्याने जर संविधानाचा अपमान होत असले तर ते संविधानही नको आणि अधिकारही नको असे म्हणून OBC ब्राह्मणांच्या पुर्वनियोजीत जाळ्यात विनासायास अडकतात .ट्रॅडिशनल प्रतिक्रियावादी बौद्ध लोक बोंबलत राहतात .OBC जनमत ब्राम्हणवादयांच्या समर्थनात उभे रहाते. संघ हे जनमत निवडणुका सहित संविधान नष्ट करण्यासाठी वापरून घेतो .


तरडेंने पुस्तकाच्या ढिगाऱ्यातून गणपतीच्या मूर्तीखाली संविधानच ठेवले त्याचे हे कारण आहे .बाकी संविधानाच्या वर मूर्ती का ठेवली हा चर्चेचा मुद्दाच नाही .जनमत बनवण्याचा मुद्दा आहे.

(Brhamins have brains within brain-Dr Babasaheb Ambedkar)

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post