एक पोस्ट वायरल केली जात आहे.

सुप्रीम कोर्टाची राष्ट्रीय मुद्रा अशोकस्तंभाच्या खालील "सत्यमेव जयते" ही ब्रीदवाक्य बदलली.आणि तीथे "यतो धर्मस्ततो जयः" असं नवं ब्रीदवाक्य एड केलं आहे.


लोकांनी कोणतीही माहिती न घेता त्यावर विश्वास ठेवला आणि टीका करायला सुरुवात केली.आम्ही याची पडताळणी केली.


या वाक्यांचा अर्थ काय होतो अगोदर जाणून घेऊया.


यतो धर्मस्ततो जयः (IAST: यतो धर्मस्ततो जया;) 


अर्थ - जिथे धर्म आहे तीथे विजय (जय) आहे.


"सत्यमेव जयते "


अर्थ- नेहमी सत्याचा विजय होतो 


कालपासून याबाबतची पोस्ट वायरल व्हायला लागली.आम्ही जेव्हा शोधलं तेव्हा मात्र २०१९ पासून २०१८ पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या मुद्रेखाली 

"यतो धर्मस्ततो जयः" अशी ब्रीदवाक्य दिसली.याशिवाय विकिपीडियाच्या संदर्भात हा बदल ९ जून २०१७ साली करण्यात आल्याचे समजते.


मुळातच आपलं सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना झालीय 1950 साली.जेव्हा आपल्याकडे विकिपीडिया सुद्धा नव्हतं.


आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वकील एड.पायल गायकवाड यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्ट अस्तित्वात असल्यापासून हा उल्लेख तीथे कायम आहे.असं त्यांनी कळवलं.तसेच अशोक स्तंभाखाली असणारे "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य बदलली नसून ती अफवा असल्याची पोस्ट त्यांनी केलेली आहे.


त्यामुळे वरील गोष्ट ही कुणीतरी जाणूनबुजून किंवा अज्ञानातून अफवा पसरवत असल्याचे स्पष्ट होते.आमच्या पडताळणीत आणखी काही माहिती मिळाली आहे.आपल्या देशातील काही सरकारी संस्था आणि त्यांची ब्रीदवाक्ये आम्हाला समजली ती पुढीलप्रमाणे . 


भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य  – ‘सत्यमेव जयते’,

भारतीय नौदल Navy  – शं नो वरुणः, 

भारतीय वायुसेना – नभःस्पृशं दीप्तम्,

 बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF : जीवन पर्यन्त कर्तव्य, 

भारतीय गुप्तचर संस्था  RAW – धर्मो रक्षति रक्षित:, 

 Intelligence Bureau IB : जागृतं अहर्निशं, 

भारतीय तटरक्षक दल  Coast Guard : वयं रक्षामः, 

महाराष्ट्र पोलीस  – सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, 

 DRDO: बलस्य मूलं विज्ञानम्, 

 NCERT : विद्यया अमृतमश्नुते 

 LIC   – योगक्षेमं वहाम्यहम्, 


हे आता नीट समजून घ्या,आणि पुढीलवेळी असे काही आले तर अगोदर थोडा विचार करा.माहिती घ्या आणि मगच व्यक्त व्हा.


 सत्यमेव जयते!

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post