सचिन पायलट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.  राजस्थान चे उपमुख्यमंत्री असलेले सचिन पायलट यांनी स्वत: च्या कॉंग्रेस पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत (Ashok Gehlot)  यांचे कॉंग्रेस सरकार धोक्यात आले आहे.  सचिन पायलट यांनी त्यांना समर्थन देणार्या  आमदारांसह दिल्ली गाठली होती आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची मागणी केली होती, पण सोनीया गांधी ह्यांनी भट नाकारली.  यानंतर सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी 30 कॉंग्रेसचे आमदार आणि काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे असा दावा केला आहे, त्यामुळे अशोक गहलोत सरकार अल्पसंख्याकात येण्साची चीन्ह दिसत आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे कॉंग्रेस सरकार कोसळले होते.  असे मानले जाते की त्याच धर्तीवर राजस्थानमध्ये सचिन पायलट ह्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्ष कॉंग्रेस ला महागात पडू नये.  सन 2018 मध्ये राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याच सचिन पायलटची महत्त्वपूर्ण भूमिका होती, परंतु कॉंग्रेस हाय कमांडने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केले.  सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले पण त्यानंतर ते आणि अशोक गहलोत कधीच जमले नव्हते.  मुख्यमंत्री गहलोत सचीन पायलट ह्यांच्याकडे  दुर्लक्ष करतच राहिले, दुसरीकडे पायलट स्वत: च्या सरकारला नेहमीच विरोधकांसारख घेरत  राहिले.  राज्याच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाच्या चौकशीत सचिन पायलटला नोटीस बजावल्यामुळे तणाव वाढला होता.  या चौकशीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही नोटीस पाठविली गेली होती, परंतु सन 2018 मध्ये सरकार स्थापन झाल्यापासुन सचिन पायलट ह्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते, शेवटी आता त्यांनी लढा देण्याचे ठरवले आहे.

त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदारांसह  दिल्लीला गेले, तेथे त्यांना कॉंग्रेस अध्यक्षांना भेटण्यास परवानगी देण्यात आली नाही.  कॉंग्रेस पक्षाने सोमवारी सकाळी जयपूर येथे विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आणि त्यात सर्व आमदारांच्या उपस्थितीसाठी व्हिप जारी करण्यात आला.  त्यानुसार, खासदार किंवा एखादा आमदार  गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

पायलट ह्यांनी बर्‍याच वेळा स्वत: च्या च सरकार ला घेरले आहे.

 राजस्थानचे उपमुख्यमंत्री असूनही सचिन पायलट यांनी कित्येक प्रसंगी स्वत: च्या सरकारवर ताशेरे आढले आहेत.  कोटा येथील मुलांचा मृत्यू असो किंवा नागौरच्या बाडमेर येथे दलितांवरील हल्ल्याचा प्रकार असो, आयलटने आपल्या सरकारविरोधातच आवाज उठविला.  पायलट यांनी वाढत्या भ्रष्टाचार आणि आमदार आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर न होणार्या  सुनावणी बद्दलही सरकारवर जाहीर टीका केली.

सचिन पायलट यांची राजकीय कारकीर्द:


 सचिन पायलट 2004 मध्ये प्रथमच दौसा प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढले आणि विजयी झाले.  त्यावेळी ते वयाच्या 26 व्या वर्षी देशातील सर्वात तरुण लोकसभेचे सदस्य झाले.  २००9 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या किरण माहेश्वरीला  76,००० मतांनी पराभूत केले.  २०१२ मध्ये ते दळणवळण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री झाले.  २०१४ च्या मोदी लाटेत सचिन पायलट यांना लोकसभा निवडणुकीत संवरलाल जाट यांच्या कडून 171983 मतांनी पराभूत पराभवाचा सामना करावा लागला.  यानंतर सचिन पायलट यांना राजस्थान कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले गेले.  2018 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी टोंक भागातील युनूस खानला 54179 मतांनी पराभूत केले.  त्यांना मुख्यमंत्री केले जाईल असा विश्वास होता पण अशोक गहलोत यांना पसंती देण्यात आली.  17 डिसेंबर 2018 रोजी त्यांना उपमुख्यमंत्रीपदी समाधान मानावे लागले.

वैयक्तीक जीवन:


 सचिन पायलटचा जन्म 7 सप्टेंबर 1977 रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे झाला.  त्यांचे वडील कै  राजेश पायलट हे माजी केंद्रीय मंत्री होते.  त्यांचे प्रारंभिक शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स बाल भारती शाळेत झाले.  त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बी.ए.  त्यानंतर आयएमटी गाझियाबाद येथून  डिप्लोमा इन मार्केटींग प्राप्त केले.  त्यानंतर सचिन पायलटने अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले होते.  15 जानेवारी 2004 रोजी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्लाशी त्यांचा विवाह झाला.  त्यांना दोन मुले आहेत.

प्रादेशिक सैन्यात अधिकारी:


 सचिन पायलट हे  सप्टेंबर २०१२ रोजी पहिले केंद्रीय मंत्री होते जे  भारताच्या प्रादेशिक सैन्यात (Territorial Army) आधीकारी म्हणून नियुक्त केले गेले होते.  या मुळे त्यंना लेफ्टनंट पायलट म्हणून देखील ओळखले जाते.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post