कोरोना विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन होता. पण हळूहळू सर्व काही उघडण्यास सुरवात झाली आहे. पर्यटन क्षेत्र देखील त्यापैकी एक आहे. पण , अजूनही  विषाणूचा धोका टाळता आला नाही. अशा परिस्थितीत लोकांना पर्यटनाकडे  आकर्षित करणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. हेच कारण आहे की प्रत्येकजण काहीतरी इनोवेटिव्ह पद्धती वापरत आहे. व्हिएतनामची राजधानी हनोइ येथील डोल्से हनोई गोल्डन लेक होटलही त्यापैकीच एक आहे.

(Gold Plated Hotel in Vietnam)

Gold Plated Hotel in Vietnam
    Source: reuters

या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे एन्ट्री गेटपासून कॉफीच्या कपपर्यंत सर्व काही  सोन्याचे बनवलेले आहे. होय, जगातील हे पहिले सुवर्ण हॉटेल आहे. या हॉटेलचे दरवाजे, कप, टेबल्स, खिडक्या, नळ, जेवणाची भांडी आणि अगदी वॉशरूम देखील सोन्यापासून  बनवलेले आहेत.

बाथटब, सिंक, शॉवर ते वॉशरूमपर्यंतच्या  सर्व वस्तू  सोनेरी आहेत.  हे हॉटेल Hoa Binh Group आणि Wyndham Hotels & Resorts Inc.  यांनी बनवले आहे. त्याच्या छतावर इन्फ़िनिटी पूल बांधला आहे. येथून हनोई शहराचे सुंदर दृश्य दिसते. इथल्या छताच्या भिंतींमध्ये गोल्ड प्लेटेड विटादेखील आहेत.

    Source: deccanherald

Hoa Binh Group चेअरमन Nguyen Huu Duong म्हणाले, 'सध्यातरी, जगात यासारखे दुसरे हॉटेल नाही.'


 या हॉटेलमध्ये हॉटेल थांबलेले तसेच सवतः एका हॉटेलचे मालक असलेले 62 वर्षीय Van Thuan म्हणाले, 'या हॉटेलने लक्झरीबद्दल माझे मत पूर्णपणे बदलले आहे.सामान्यत: संगमरवरी फरशा लक्झरी हॉटेलमध्ये वापरल्या जातात परंतु येथे सर्व काही सोन्याचे बनलेले आहे. अगदी  वॉश बेसिन सुद्धा.  '

25 मजल्याच्या ह्या  5 स्टार हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. येथे 6 वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि सुइट आहेत. प्रेसिडेंशियल सुइटमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 4..8585 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याच वेळी, डबल बेडरूममध्ये एका रात्रीचे भाडे सुमारे 75 हजार रुपये आहे, तर हॉटेलच्या खोल्यांचे प्रारंभिक भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.
(Gold Plated Hotel room price )

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post