एकिकडे पालक विद्यार्थ्यांना लखोंची फी भरून मोठमोठ्या शाळेत प्रवेश घेतात तरही त्यांचे पाल्य म्हणावी तशी प्रगती करत नाही पण ह्या मुलीने जे केल ते पाहुन आज तीच्या घरच्यांना नक्कीच आकाश ठेंगण वाटत असणार.

महाराष्ट्रातील दहावी बोर्डाच्या परीक्षेत 17 वर्षाची अस्मा शेखने 40 टक्के गुण मिळवले आहेत.  महाराष्ट्र SSC बोर्ड ने दहावीचा निकाल 29 जुलै रोजी जाहीर केला आहे.

(Asma Shaikh  Footpath girl SSC (10th) pass woth 40% marks)

असे अनेकदा म्हटले जाते की जर एखादे काम कठोर परिश्रम आणि मन लोवून केले तर यश निश्चितच प्राप्त होते.  त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुंबईच्या फुटपाथ (Footpath) वर राहणारी अस्मा शेख.  महाराष्ट्रातील SSC बोर्डाच्या परीक्षेत 17 वर्षाची अस्मा शेखने 40 टक्के गुण मिळवले आहेत.  महाराष्ट्र मंडळाने दहावीचा निकाल 29 जुलै रोजी जाहीर केला आहे.  तिच्या यशाबद्दल आसमा म्हणाली, "मी अभ्यास करण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. अभ्यास मी रात्रीच्या स्ट्रीट लाइट खाली करायचे . मी सहसा रात्री अभ्यास करते कारण त्यावेळी गर्दी कमी असते  "

जेव्हा अस्मानाला पावसाळ्यात  अभ्यास कसा होतो करायचीस विचारले असता ती म्हणाली, "हो, पावसाळ्यात अभ्यास करायला खुप अडचणी यायच्या. पण माझे वडील ताडपत्रीपासुन शेड बनवतात. त्यामुळे थोडं अभ्यास करण सोयीस्कर होत असे"


  ती पुढे म्हणाली- 

"मी 40% पेक्षा जास्त गुण मिळण्याची अपेक्षा करत होते, पण मी माझ्या गुणांवर खूष आहे."

आस्माला पुढील शिक्षणासाठी कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे.  अस्मा म्हणाली, "कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला तरी मला खूप आनंद होईल. बरेच लोक मला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत आणि मला अभ्यासासाठी प्रोत्साहित केले आहे."

 आपल्या मुलीच्या यशाबद्दल अस्माचे वडील सलीम शेख म्हणाले, "माझ्या मुलीला 40 टक्के मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी फक्त पहीली पर्यंत शिकलो आहे. फुटपाथवक राहणारे फारच कमी लोक शिकत असतिल. "

ते पुढे म्हणाले,

 "मी वडिलांसोबत येथे आलो आहे आणि लहानपणापासूनच येथे राहत आहे. माझी मुलगी स्वत:चे आयुष्य स्थिर व यशस्वी करू शकली तर मला खुप आनंद होईल."

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post