70 च्या दशका पर्यंत सिडनी टूर एजन्सीने कोलकाता ते लंडन आणि लंडन ते कोलकाता अशी एक अरामदायक बस सेवा चालू केली होती. यात खाण्या-पीण्याची ची सोय होती, वाटेत एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम असायचा आणि विशेष म्हणजे ही एक स्लीपर बस होती. ही बस बर्याच देशातुन प्रवास करत असे.
(Kolkata to london bus)
70 च्या दशकात कोलकाता ते लंडन पर्यंत बस सेवा सुरू होती ह्यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना? इतक्या लांब बसने बस प्रवास कोण करेल म्हणा कदाचित आता कोणालाही ह्यावर विश्वास बसणार नाही पण हेच खरे आहे. सिडनीची अल्बर्ट टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीने ही बस सेवा चालु केली होती. ही बस सेवा सुमारे 1973 पर्यंत सुरू होती. यानंतर ती बंद करण्यात आली. आणि ह्या बसचा रूट देखील खूप मनोरंजक होता.
या बससेवेचे हे तिकिट आहे. ज्यामध्ये त्या बसमधील सुविधा, भाडे आणि मार्ग याबद्दल नमूद करण्यात आले होते. या बसच्या सुटण्याचा दिवस आगोदरच ठरविण्यात येत असे आणि लंडनला पोहोचण्याचा दिवसही. भारत ते लंडन प्रवास करत ही बस अनेक देशांतून जात असे. वाटेत बरेच थांबे ह्या बस ला होते होते. बर्याच वेळा, वाटेत जाताना एखाद पर्यटन स्थळ असेल तर, टूर संचलीत करणारी कंपनी कंपनी प्रवशांना पर्यटन स्थळाजवळील होटेल मध्येच मुक्काम नीयोजीत करायचे.
ह्या बसने मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास कारायचे. कोलकाता येथून बस नीघाली की. ती नवी दिल्ली, काबुल, तेहरान, इस्तंबूल ह्या मार्गे लंडनला पोहचायची. लंडनहून ही बस त्याच मार्गाने कोलकाताला परत जायची. हा कार्यक्रम अशा प्रकारे बनविला गेला होता की त्यास 45 दिवस लागत असत परंतु बस ठीकाणी मुक्कामी थांबायची की लोकांचा प्रवास अत्यंत आरामदायक आणि संस्मरणीय असेल. उदाहरणार्थ, वाटेत कुठेतरी प्रसिद्ध रोमिंग प्लेस असेल तर बस थांबवली जायची आणि प्रवाशांना फिरण्याची संधी दीली जात असत.
1972 मध्ये ही बससेवा कोलकाता ते लंडन च्या प्रवासासाठी 145 पाऊंड एवढे मोठे शुल्क आकारत होती, परंतु नंतर ह्या बसचे भाडे वाढले, परंतु ह्या शुल्कात बसचे भाडे, जेवण, नाश्ता आणि वाटेत हॉटेलमध्ये थांबायची सोय यांचा समावेश होता. तुम्हाला ही वर जी बस दिसतीये, ती कोलकातामधून प्रवाशांना ठिकठिकाणाहून घेऊन त्या डबल डेकर बसकडे जायची, ज्याला अल्बर्ट बस म्हणून जास्त ओळखले जात असे.
बसमध्ये प्रवास करणार्या प्रवाश्यांसाठी झोपण्यासाठी व्यवस्था असायची. खिडकीतून त्यांना बाहेर दिसू शकले ह्यासाठी खास बाल्कनी देखील होती. बसमध्ये एक सलून, पुस्तके वाचण्यासाठी एक जागा आणि बाहेर बघण्यासाठी एक खास बाल्कनी होती. आपणास असा आरामदायक प्रवास कोठेही मिळणार नाही, असा दावा त्या बस चा होता. यामध्ये आपणास असे वाटते की आपण घरी आहात.
नंतरच्या काही वर्षांच या बसचे तिकिट आहे. तोपर्यंत त्याचे भाडे 305 डॉलर पर्यंत वाढले होते. बस तिकिटामध्ये असेही लिहिले होते की जर भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सीमा बंद झाली तर प्रवाशांना हवाईमार्गाने पाकिस्तानच्या वरतुन नेले जाईल. पण भाडे अधिक होईल. या बसने लोकांचा प्रवास संस्मरणीय होता.
कोलकाता ते लंडन हे अंतर सुमारे 7,957 किमी आहे तर पृथ्वीचा व्यास 12,742 किमी आहे. या बसने प्रवासात पृथ्वीच्या अर्ध्याहून अधिक व्याप्त करायचा.
Post a Comment
कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .