संपुर्ण जगभरात कोराना महामारीचे संकट आहे हे आपल्याला माहीतीच असेल, कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वजण आपआपल्या परीने काळजी घेत आहे, घरातुन बाहेर पडताना प्रत्येकजण मास्क घालुन बाहेर पडतोय, आणि सरकारही मास्क व सैनेटायझर वापरण्याचे अवाहन करतय आज पर्यंत आपण वेग वेगळ्या प्रकारचे तसेच डीझाईनचे कापडी मास्क पाहीले असतील पण कधी तुम्ही सोन्याचा मास्क पाहीलाय का ? काय चकित झालात ना ? पण हे खर आहे. (Gold Mask in Pimpri chinchwad)

 सविस्तर माहीती अशी की पिंपरी चिंचवडचे गोल्डन मेन म्हणुन ओळख असलेले शंकर कुऱ्हाडे ह्यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये त्यांनी खर्च केले आहेत. आधीच गळ्यात सोन्याचा गोफ, पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये. कोरोनाच्या महामरातीत बनवलेल्या त्यांच्या या मास्कमुळं सध्या सर्वांच्या नजरा त्यांच्यावर पडतायेत व उलट-सुलट चर्चा ही सुरु आहेत, पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत. ते म्हणतात चर्चा तर होणारच. (shankar kurhade gold mask)

शंकर कुर्हाडे म्हणाले की, ' गेल्या आठवड्यात मी टीव्हीवर चांदिचा मास्क घालुन फिरणारा माणुस पाहीला. मग मी माझ्या सोनाराला संपर्क करून  चांदिचा मास्क बद्दल सांगितले व आपण सोन्याचे मास्क बनवू शकतो का विचारले, माझ्या सोनाराने 15 दिवसात मला हा मास्क बनवून दिला.' (golden man )

पुढे ते म्हणाले, ' मी माझ्या परिसरातील गरीब  तीन हजार कुटुंबांना धान्य व किराणा चार वेळा वाटलय, त्यांना मास्क व साबणाचेही वाटप केलय, एवढ वाटप करून जे ऊरलय त्यातुन हे मास्क बनवून घेतलय'

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post