'तो कैसे हैं आप लोग?''

 ही ओळ वाचल्यानंतर तुम्हाला समजले असेलच की आपण कोणाविषयी बोलत आहोत.  होय, आपले आवडते YouTube कॅरी मिनाटी उर्फ अजय नगर ह्यांच्याबद्दल.  वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी कॅरी मिनाटी (Carry Minati) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे एक मोठे नाव बनला आहे.  त्याचे लाखो चाहते आहेत.  आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की कॅरी कोणालाही रोस्ट करू शकतो, पण जर त्या कोणी त्याला रोस्ट करण्याच प्रयत्न केला तर रोस्ट करणारा स्वतःच रोस्ट होतो.

फॅन्सच्या या प्रेमामुळे कॅरी इतका मोठा स्टार बनला आहे.  पण एवढ्या लहान वयात कोणीतरी इतका मोठा YouTuber कसा झाला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?  याचा अर्थ असा की जेव्हा लोक कॉलेज ला जाण्याचे आणि काहीतरी बनण्याचे स्वप्न पाहतात तेव्हा कॅरीने त्या वयात खूप लोकप्रियता मिळविली आहे.  तो ट्विटरवर दररोज ट्रेंड करत आहे.


अजय नगर नावाचा मुलगा इतका मोठा YouTuber कसा झाला? ( Carry Minati success story)


 12 जून 1999 रोजी जन्मलेला कॅरी दिल्लीच्या फरीदाबादचा रहिवासी असून त्याने दिल्ली पब्लिक स्कूलमधुन शिक्षण घेतले आहे.  लहानपणापासूनच कॅरी चे मन आभ्यासात रमत नव्हते.  म्हणूनच त्याने वयाच्या 10 व्या वर्षी त्याने एक यूट्यूब चॅनेल उघडले.  कॅरीच्या पहिल्या यूट्यूब चॅनलचे नाव 'StealThFearzz' होते, जे फारसे  लोकप्रिय होऊ शकले नाही.  पण त्यानंतर कॅरी येथे थांबला नाही, तिने 'Addicted A1' नावाचे एक चॅनेल उघडले, ज्यात तो सेलिब्रीटींच्या मिमीक्री चे  व्हिडिओ बनवत असे.  यादरम्यान, कॅरीला काय झाले माहित नव्हते आणि त्याने चॅनेलचे नाव बदलून 'कॅरी देओल' केले.

यानंतर, त्याने पहील्यांदा भुवन बामची रोस्टींग केलेला व्हिडिओ यूट्यूबवर टाकला.  रोस्टींग च्या पहील्याच विडीओ नंतर, कॅरीच्या चॅनेलचे सब्सक्राबर झपाट्याने वाढले.  आता कॅरी लोकांच्या नजरेत आला, त्याच्यावर चर्चा चालू झाल्या.  त्याची वाढती लोकप्रियता पाहून कॅरीने त्यालाच आपला व्यवसाय बनवला आणि यूट्यूब चॅनेलचे नाव बदलून 'कॅरी मिनाटी' केले.

कॅरीने काही दिवसांपुर्वी टिक टॉक विरूध्द युट्यूब असा व्हिडिओ बनविला.  या व्हिडिओने बर्‍येच रेकॉर्ड बनवले आहेत.  तरुणांमधील प्रसिद्ध कॅरी  लोकांना मदत देखील करतो.  नुकताच त्यांने बिहारमधील पूरग्रस्तांसाठी 11 लाख रुपयांची देणगीही दिली आहे.

'कॅरी मिनाटी' बघून अस वाटतं की तो इथेच थांबणार नाही, भविष्यात बर्‍याच नवीन गोष्टी तो घेऊन येईल.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post