TRP च्या दुनियेत हरवलेला हरहुन्नरी खेळाडू अविनाश साबळे.

(Avinash sabale Tokyo Olympics 2020)

टोकियो ऑलंपीक (tokyo olympics 2020) स्पर्धेसाठी देशातुन पाच खेळाडुंची निवड झाली त्यात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूची टोकियो ऑलंपिक सीठी निवड केली गेली. पण म्हणावी तशी दखल कुठल्याली मेनस्ट्रिम मीडीयाने घेतली नाही. कदाचीत त्यात त्यांना  TRP दिसली नसावी. 

जागतीक एथलिटिक्स स्पर्थेमध्ये ह्या खेळाडून 3000 मी.पुरूष गटातील  स्टीपलचेस (steeplechase)  सर्वोत्तम अजिक्यंपद  स्पर्धेत हा वक्रम नोंदवला व टोकियो स्पर्धेसाठी भारतातील पहीला वैयक्तिक खेळाडू म्हणुन त्याची निवड करण्यात आली. त्याच नाव म्हणजे अविनाश साबळे.
त्याने 2019 मध्ये 3000 मी. ची ही स्पर्धा अवघ्या 8 तास 21 मी. 37 सेकंदा मध्ये पुर्ण केली होती.

अविनाश साबळेचा जन्म 13 सप्टेबर 1994 ला बीड जिल्ह्यातील मांडवा ह्या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या  सहाव्या वर्षापासुन तो दररोज कुठलीही वाहतुकिची  व्यवस्था नसल्यामुळे सहा किलोमीटर पायी चालत किंवा धावत शाळेत जात असे. अगीदि त्याने हा प्रवास ईयत्ता पहीली पासुन ते बारावी पर्यंत केला. बारीच शिक्षण पुर्ण घेतल्यांनतर अविनाश साबळे भारतिय सैन्यात ( Indian Army ) मधील महार रेजिमेंट ( Mahar Regiment) मध्ये भरती झाला व लगेच पहीलीच पोस्टींग त्याला 2013-14 च्या दरम्यान सीयाचीन (Siachen) ला मिळाली.
असा प्रदेश जीथे तापमान नेहमीच शुन्याच्या खाली असते. 
त्यानंतर 2015 मध्ये त्याची पोस्टींग ही सिक्कीम ला करण्यात आली. 
पुढे 2018 मध्ये तो एशियम गेम्स ( Asian Games) साठी कव्लिफाईड झाला पण पायच्या दुखापतीमुळे तो त्यात सहभागी होऊ शकला नाही. पुढे त्याने 2018 च्या नेश्नल ओपन चांम्पीयनशीप  (National Open Championship) भुवनेश्वर  मध्ये झली त्यात 37 वर्षांपासुन गोपाल सैनी ह्यांच्या नावे असलेला रेकॉर्ड अविनाश साबळे ने मोडला. 8 तास 30 मीनीटे 88 सेकंदाचा हा रेकॉर्ड अविनाश साबळे ह्याने अवघ्या 8 तास 29 मीनटे 80 सेकंदात मोडीत काढला. पुढे त्याने स्वत:च असलेल रेकॉर्ड अवघ्या 8 तास 28 मीनटे 94 सेकंद मध्ये मार्च 2019 साली पटीयाला मध्ये झालेल्या फेडरेशन कप मध्ये मोडला.  ह्या कामगीरीच्या जोरावर तो पुढे एशियन एथलेटीक्स चँम्पियनशीप 2019 ( Asian Atheletics champion 2019) व वर्ल्ड एथलिटीक्स चँम्पियनशिप (World Atheletics champion 2019) साठी त्याची निवड करण्यात आली. 

अविनाश साबळेने एशियन चँपियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवले होते दोहामध्ये झालेल्या ह्या  स्पर्धेत त्याने 8 तास 30 मीनटे 19 सेंकंदात ही स्पर्धा पुर्ण केली विशेष म्हणजे ही त्याची पहीलीच अंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा होती. 1 ऑक्टबर 2019 ला त्याने वर्ल्ड चँपियनशीप मध्ये स्वत:चाच रेकॉर्ड पुन्हा मोडून काढला जीथे तो 8 तास 25 मीनटे 23 सेकंद धीवला होता. 

पुढे जाऊन त्या स्वत:ला अजु सिध्द केले व 8 तास 21 मीनटे  37 सेकंदात वर्ल्ड चँम्पियनशीप ची फायनल पुरण केली. तो 16 धावपुटू मध्ये 13 व्या स्थानावर होता ह्याच रिझल्ट मुळे तो 2020 च्या समर ऑलंपिक साठी कॉलिफाईड् झाला आहे.

अशा बातम्या कव्हर करण्याची आमच्या मेनस्ट्रीम मिडीया सद्बुध्दी येवो हीच ईच्छा. बाकी अविनाश साबळेला ऑलंपिक साठी खुप शुभेच्छा.🙏 

- टीम मराठी  IQ

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post