ह्या महामारीच्या संकाटामुळे सर्वांचीच आर्थीक घडी विस्कटली आहे. आणि त्यात काही हॉस्पिटल ही तर लोकांची फर्त लुट करताये. चिकार पैसे लोकांकडून दुखण्याच्या नावाखाली ऊकळण्याचा प्रयत्न करताये. अशातच लोकांचा डॉक्टर वरील विश्वास आता ऊडत चालला आहे. पण असे ही काही डॉक्टर असतात जे लोकांची अविरत सेवा करतात. आजची बातमी ही अशीच काहीतरी आहे अशाच एका डॉक्टर चा किस्सा आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.


अहमदाबादमधील (Ahmedabad) ही बातमी तुमच्या मनाला नक्कीच सुख देईल आणि तुमच्या चेहर्यावर हास्य आणेल.

 2 मार्च रोजी अहमदाबादच्या भोलू कोरी आणि दुर्गा यांना मूल (मुलगा) झाला.  जन्मावेळी, बाळाचे वजन एवघे 640 ग्रॅम होते, त्यामुळे त्या बाळच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

 आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला भोलू हा एक माळी म्हणून काम करतो, पण आधीच तीन मुलांच्या गर्भपात झाल्यामुळे पती-पत्नी दोघांनाही कोणत्याही किंमतीत या मुलाला वाचवायचे होते.

(640-gram baby survives after doctors crowdfund treatment)

 अशा परिस्थितीत तेथील डॉक्टरांनी कुटुंबास मदत करण्यासाठी क्राऊडफंड जमा करण्याचा विचार केला.

'अर्जुन मेडिकल फंडिंग' नावाच्या फेसबुक पेजवरून त्यांनी मुलाच्या उपचारासाठी पैसे गोळा केले.  ज्यामध्ये 158 लोकांनी डोनेशन दिलं.

 4 महिन्यानंतर 14 जुलैला रुग्णालयातून अर्जुन (मुलाचे नाव) ला सोडण्यात आले.  त्यावेळी त्याचे वजन 1.875 किलो होते.

 संपूर्ण उपचारांचे बिल 14 लाख रुपये होते, त्यापैकी 7.75  लाख रूपये लोक वर्गीणीतुन जमा केले होते आणि बाकीचे डॉक्टर आणि कुटुंबीयांना माहित असलेल्या लोकांनी मदत स्वरूपात दिले.

रुग्णालयात मुलाचा ऊपचार करत असलेले डॉ. भाविक शहा म्हणाले की, अर्जुनचे वजन कमी असल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, इंन्फेक्शन, हृदयविकाराचा त्रास आणि अनेक समस्या ऊद्भवल्या होत्या.  परंतु मुलाच्या पालकांकडे पाहून आम्ही उपचारासाठी पैसे गोळा करण्याचा विचार केला.

ही बातमी वाचुन कदाचीत महाराष्ट्रातील जी डॉक्टर महामारीच्या नावा खाली लोकांची लुट करतायेत त्यांच्या मनाला पाझर फुटेल अशी अशा करूयात.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post