IAS Officer Divya Devrajan

एक काळ असा होता जेव्हा स्त्रियांसाठी काही मर्यादा होत्या, ज्या त्यांना पार करण्यासाठी त्यांना शिक्षणाचा अभाव,  व्यव्हारीक समज आणि आर्थिक कमतरता ह्यामुळे शक्य नव्हत.  पण आजच्या युगात हे बदलले आहे.  आज महिला सुशिक्षित आहेत, स्वत: साठी पैसे कमवू शकतात.  यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  आता त्यांना कुठल्याही सीमा मर्यादा अडवू शकत नाहीत, ते  त्यांचे स्वप्न मनमोकळेपणे जगत आहेत आणि इतर स्त्रियांसाठी प्रेरणा बनत आहेत.

२०१० च्या तुकडीतील अशाच एक आयएएस अधिकारी म्हणजे दिव्या देवराजन, ज्यांनी पूर्ण प्रामाणिकपणाने आपले काम केले.  त्या बदल्यात आदिवासींनी भेट म्हणून त्यांच्या गावाचे नाव दिव्यागुडा असे ठेवले.

 यामागची कहाणी अशी की 2017 मध्ये आदिवासींच्या अनेक समस्यांच्या बातम्या आल्या.  त्याच वेळी, दिव्या देवराजन ह्यांची तेलंगानाच्या आदिलाबादमध्ये पोस्ट होती.  त्यांनी दि बेटर इंडियाला सांगितले की,

" रात्रीचा प्रवास करून मी तिथे पोहोचले.  पदभार स्विकारल्यानंतर मला तेथील समस्या समजल्या.  मला वीटले की चर्चा करून तोडगा नीघु शकतो.  म्हणून मी त्याची गोंडी भाषा 3 महिन्यांत शिकले."

पुढे त्या म्हणाल्या,

"लोकांना त्यांचे मत मांडायच होते.  जेव्हा त्यांना वाटले की मी त्यांची भाषा बोलू शकते, तेव्हा ते माझ्यासमोर मनमोकळे पणाने त्यांचे म्हणणे बोलु लागले."

दिव्याने अनेक सरकारी रुग्णालयात विशेष आदिवासी समन्वयक आणि भाषा अनुवादकांची नेमणूक केली.  तसेच आदिवासींना प्रशासकीय कार्यालयात जाण्याचा मार्ग सोपा केला.  या प्रयत्नांमुळे ती या आदिवासी लोकांची 'ऑफिसर मॅडम' बनली.  फक्त त्यांचा सन्मान करण्यासाठी गावकर्यांनी त्याचे नावावरतु गावाला नाव दिले.

याशिवाय दिव्याने निरक्षरता, बेरोजगारी, स्वच्छता, सिंचन, आरोग्य आणि पूर या विषयांवरही काम केले.  

आंतरजातीय हिंसाचार, कर्फ्यू आणि डेटा कनेक्टिव्हिटी यासारख्या मुद्द्यांशी झगडणार्या या लोकांच्या हृदयात गिव्यैला लवकरच स्थान मिळाले.

 दिव्यागुडा असे नाव देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार्या थोटी समाजाचे आदिवासी नेते मारुती यांनी 'बेटर इंडिया'ला सांगितले की, "दिव्या मेडम आल्यानंतर प्रत्येकजण येथे गांभीर्याने कामाला लागला."  मी यापूर्वी कधीही ऑफिसला गेलो नाही, पण मेडम आल्यापासून मीसुद्धा ऑफिसला जाऊ लागलो.

दिव्याबद्दल बोलताना ते म्हणाले,

 त्यांनी प्रत्येक व्यक्तीला कार्यालयात पोहोचणे सोपे केले.  त्यांनी खेड्यातील प्रत्येक घरात भेट दिली आणि प्रत्येकाची नावे त्यांना ठाऊक आहेत.  याशिवाय जिथे मारुती राहतात तिथे दरवर्षी पूर येण्याची शक्यता असते.  पदभार घेतल्यानंतर दिव्याने जागा समतोल करण्याचे काम सुरू केले ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला.

बिट्स पिलानी मधुन अभियांत्रिकी करणारी दिव्या ह्यांचे प्रेरणास्थान त्यांचे वडील आणि आजोबा आहेत.  त्यांना पाहून त्यांच्यात सेवेची भावना जागृत झाली.  त्यांचे आजोबा एक शेतकरी असून वडील तामिळनाडू विद्युत मंडळामध्ये कार्यरत होते.  सध्या दिव्याची अदिलाबादहून बदली झाली आहे आणि २०२० मध्ये त्यांची महिला, बाल, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सचिव व आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post