'आम्ही बालु तरी काय जर ते काहीच ऐकत नाहीत,
आम्ही ऐकु तरी काय जर ते काहीच बोलत नाहीत.'


देशात कोरोना विषाणूच्या रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.  भारत आता जगात कोरोना रूग्ण संख्येत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सरकार ने लॉकडाउन जाहीर केले होते त्या काळात भारतात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण खूप कमी होते.  पण सध्याची परिस्थीती पाहून अस वाटतय आता लॉकडाउन अपयशी ठरले आहे.

सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूचा धोका आहे.  जवळपास सर्वच देशाच्या राष्ट्रध्यक्षांनी जनतेला संबोधित केले, पत्रकार परिषद घेतल्या, कोरोना विषाणू इत्यादी विषयी महत्वाची माहिती दिली.  पण त्यात  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत ज्यांनी या महामारीच्या वेळी एकदाही पत्रकारांना संबोधित केले नाही.  आत्मनिर्भर भारत होण्यावर भाषणे झाली, लॉकडाऊन दरम्यान लोकांना सर्व प्रकारची टास्क देण्यात आली, मदत पॅकेज जाहीर करण्यात आले पण खर्या कारणांमुळे पत्रकार परिषद कधी घेण्यात आली नाही.

लोक म्हणतात की असा एक काळ होता जेव्हा नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांना 'मौन मोहन सिंग' असे संबोधून त्यांची चेष्टा करायचे.  अशा परिस्थितीत आता कोणी मौन धारण केल  आहे? अस लोक विचारतायेत.

एका आरटीआयच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पत्रकार परिषद आणि माध्यमांच्या मुलाखतींची माहिती विचारली गेली.  पण अधिकृतरित्या पंतप्रधान कार्यालयाकडे याची नोंदच नाही.

 एक प्रख्यात पत्रकार म्हणतात की जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामाबद्दल, त्यांचे परदेश दौरे, योग इत्यादी बद्दल विचारले जाते तेव्हा ते नेहमी याबद्दल मोकळेपणाने बोलतात.  पण जेव्हा कठीण प्रश्ना विचारले जातात  तेव्हा ते एकतर मुलाखत संपवतात किंवा विषय बदलतात.

 असेही म्हटले जाते की पंतप्रधान मोदींचे पत्रकारांशी चांगले संबंध नाहीत.  ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी गुजरात दंगलीबाबत मोदींना प्रश्न विचारले असता त्यांनी रागाने मुलाखत सोडली होती.

जगभरातील लोक भारतात लादलेल्या लॉकडाऊनबद्दल चर्चा करत आहेत.  नावजलेल्या अर्थतज्ज्ञांनी असे म्हटले आहे की आपण ह्या महामारीतुन जरी वाचलो तरी आपण आर्थिक परिस्थीतितुन सावरू शकणार नाही.  नोटबंदी आणि जीएसटीमुळे आधीच बाजारपेठेतील मागणी कमी झाली होती.  कोरोनाने त्यावर एक प्रकारे जखमेवर मीठ चोळले आहे.

अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना तयारी करण्याची संधी मिळाली नाही.  लॉकडाऊन मध्ये वेळोवेळी शिथीलता देण्यात आली, पण पोलिसांना ते समजू शकले नाही.  परिणामी, लोक काठ्यानी रस्त्यावर पोलिसांचा  मार  खाताना दिसले.  कोट्यवधी बेरोजगार, निराधार परप्रांतीय कामगारांना हजारो मैलांचा पायी प्रवास करू घराकडे व खेड्यात परत जावे लागले.  काही भुकेमुळे मरण पावले तर काही वाटेवर चालताना मरण पावले.  जे लोक थकल्यामुळे ट्रेनच्या पटरीवर झोपी गेले त्यांना ट्रेनने कायमचे झोपायला लावले. मागे ऊरल्या त्या फक्त भाकरी ज्यासाठी त्यांनी आपले घर आणि गाव सोडले होते.त्यानंतर बर्‍याच दिवसानंतर आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आणि त्याबरोबरच नवी दिल्लीचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प जाहीर करण्यात आला.

  तुम्हाला सांगायला आवडेल, डोनाल्ड ट्रम्प दर काही दिवसांनी आपल्या राष्ट्राला संबोधित करतात आणि त्यांना महामारीच्या परिस्थितीबद्दल चा आढावा सांगतात.  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जवळजवळ दररोज देशाला संबोधित करतात.  दोघेही माध्यमांना उघडपणे तोंड देतात आणि खर्या मुद्द्यांवर चर्चा करतात.  न्यूझीलंडही कोरोनापासून मुक्त झाला आहे आणि तिथे महिला नेतृत्वाने हे  करून दाखवले आहे.  ही महामारी सर्व जागतिक नेत्यांसाठी एक कठीण परीक्षा आहे.  परंतु या आव्हानादरम्यान संपूर्ण जगाचे नेते खर्या मुद्द्यांवर देशाला संबोधित करीत आहेत, पण ते भारतात होताना दिसत नाही.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post