महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 50 हजार वर्ष जुने तलाव आहे, ज्याचे नाव लोणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या पाण्याचा रंग हिरव्या रंगातुन गुलाबी रंगात बदलला आहे. सरोवराच्या पाण्यात झालेल्या या विचित्र बदलांमुळे स्थानिक लोक आणि वैज्ञानिक चकित झाले आहेत.
लोणार सरोवर हे उल्कापाताच्या घटनेने मुळे तयार झालेले जगातील तिसरे सर्वात मोठे तलाव आहे. पण ते उल्का कधी आले आणि कोठे गेले याचे रहस्य कोणालाही माहिती नाही. हे तलाव मुंबईपासून 500 कि.मी. अंतरावर बुलढाण्यात आहे. या तलावाचे पाणी अचानक हिरव्याचे गुलाबी रंगाचे झाले आहे. तलावातील हा बदल पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आणि त्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विडीओ :
पाण्याच्या रंगात अचानक झालेल्या या बदलाची अधीक माहिती शोधली जात आहे. वनविभागाने या तलावाच्या पाण्याचे नमुना गोळा केल्याचे लोणारच्या तहसीलदारांनी सांगितले कि, हे असे का घडले ते पाणी तपासल्यानंतरच कळेल.
लोणार तलाव कसा बांधला गेला याचे रहस्य आजपर्यंत सापडलेले नाही. पुराणातही या तलावाचा उल्लेख आहे. सुमारे 7 किलोमीटर व्यासावर पसरलेल्या या तलावाची खोली 150 मीटर आहे. जेम्स एडवर्ड अलेक्झांडर यांनी 1823 मध्ये हा तलाव शोधला होता.
आयआयटी बॉम्बेच्या मते, या तलावाच्या मातीत सापडलेले खनिजे चंद्रावरी खडकांच्या खनिजांमध्ये आढळतात, ज्यांचे नमुने अपोलो मिशन दरम्यान पृथ्वीवर आणले गेले होते.
Post a Comment
कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .