कोरोना विषाणूचा देशात प्रवेश झाल्यानंतर  लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.  या दरम्यान, आपण एखाद्यास कॉल केला असता, आपण एक कॉलर ट्यून ( Corona Caller Tune) नेहमीच ऐकली असेल.  या कोरोना कॉलर ट्यूनमध्ये एक महिला कोरोना विषाणूपासून संरक्षण, संक्रमितांना लोकांकडून होणारा भेदभाव तसेच त्यासंबंधित इतर खबरदारीची माहिती देते.  हा आवाज आणि कोरोना विषाणूची कॉलर ट्यून  ह्या दोन्ही गोष्टीनी लोकांच्या मनात  घर केल आहे.  पण तो कोणाचा आवाज आहे हे आपणास ठाऊक आहे का?

तर हा आवाज आहे व्हॉईस ओव्हर कलाकार आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जसलीन भाला यांचा.  जसलीन भाला ह्या सध्या व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणुन काम करत आहे, परंतु त्या एक पत्रकारिका आहेत आणि स्पोर्ट्स जर्नलीस्ट म्हणुन काम करत होत्या.  पण सध्या जसलीन  गेली 10 वर्षे पासु व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणुन फुलटाइम  काम करत आहेत.

कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून हा भारत सरकारचा एक उपक्रम होता.  यात जसलीन भाल्ला सांगतात - आज संपूर्ण देश कोरोना विषाणू म्हणजेच कोविड -१९ बरोबर लढा देत आहे.  परंतु लक्षात ठेवा, आपल्याला रूग्नाविरूद्ध नाही तर रोगाविरुद्ध लढायचे आहे.  त्यांच्याशी भेदभाव करू नका.   ही जसलीन भल्ला सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे.  कारण बर्‍याच दिवसांपासून लोक त्याचा आवाज दिवसातून अनेक वेळा ऐकत आहेत आणि आता त्यांना याची सवय झाली आहे.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post