केरळमध्ये स्फोटकांनी भरलेल्या अननस खाल्ल्यानंतर गर्भवती हाथिनी चे निधन झाले, पण पटण्यात दोन हत्तींना त्याच्या मालकाने लक्षाधीश केले आहे.

 देशभरात,  बरेच लोक हत्तींना ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांची कातडे आणि दातांची तस्करी करून अमाप पैसा कमवतायेत .  पण पटना येथील जानीपूर येथील 50 वर्षीय मोहम्मद अख्तरने दोन हत्तींच्या नावावर स्वत:ची ५ कोटी रूपयांची जमीन दोन हत्तींच्या नावे केली आहे, हे एक माणुसकीचे उदाहरण आहे.

 मोहम्मद अख्तर हे 12 वर्षांचे होत् तेव्हापासून हत्तींची सेवा करत होता.  या कालावधीत, त्यांना प्राण्यांवर इतका प्रेम झाल की त्यांनी हत्ती पाळण्याचा विचार केला.  अख्तरकडे 20 वर्षांचे मोती आणि 15 वर्षाची राणी असे दोन हत्ती आहेत.

 या दोन हत्तींसाठी सर्व काही त्याग करणार्या अख्तरला लोक 'हत्तीवाला' म्हणून संबोधतात.  त्यांच्यासाठी कुटुंब असो वा समाज, सर्व काही हत्ती हेच आहे.  अख्तर हत्ती संरक्षण करणार्या "इरावत संस्थे" चा मुख्य व्यवस्थापक देखील आहे.  त्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त हत्तींसाठीच समर्पित केलेल आहे.

मोहम्मद अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा चुकीच्या मार्गाला सागला होता, म्हणून त्यांनी त्याला संपत्तीतुन बदखल केल व अर्धी संपत्ती पतीच्या  आणि त्यांच्या हिस्स्याची संपत्ती ही  दोन्ही हत्तींच्या नावावर केली आहे.  अख्तर यांना रजिस्ट्री कार्यालयात जाऊन दोन्ही हत्तींच्या नावे केलेल्या जमीनीचे दस्ताऐवजही बनवले आहेत.

मोहम्मद अख्तर पुढे म्हणतात की, हत्तींच्या नावाने माझी सर्व संपत्ती केल्यानंतर जर माला काही झाले तरी माझी सर्व संपत्ती 'इरावत संस्था' च्या नावे असेल, जेणेकरुन या हत्तींचे संरक्षण होईल आणि तस्करांकडून त्यांना वाचवता येईल. 


हत्तींनी मला प्राणघातक हल्ल्यापासून वाचवलं होत.

 मोहम्मद अख्तर सांगतात की, एकदा माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळी एका हत्तीने मला वाचवले.  हातात पिस्तूल घेऊन मला ठार करण्यासाठी काही गुंड माझ्या खोलीकडे जात होते, तेव्हा हत्ती त्यांना पाहून ओरडायला.  इतक्यात मी उठलो आणि मी आरडाआोरड सुरू केली, माझा अवाज ऐकुन तेव्हा ते तेथून पळून गेले.मुलाने संपत्तीसाठी मला तुरूंगात डांबले होते

 आपल्या मुलाला संपत्तीतून हाकलून लावण्यामागचे कारण सांगताना अख्तर म्हणतात की, संपत्तीच्या मोहापायी माझ्या मुलाने माझ्या त्याच्या  स्वतःच्या मैत्रिणीवर  मी बलात्कार केल्याचा खोटा आरोप करून मला तुरूंगात पाठविले.  पण माझी तपासात निर्दोष सुटका झाला.  वास्तविक, माझा मुलगा 'मेराजने' जनावरांच्या तस्करांशी हातमिळवणी करून हत्ती विकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो पकडला गेला.  म्हणून मी माझी सर्व संपत्ती या हत्तींच्या नावे केली आहे.

हे दोन हत्ती माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत.  माझ्या कुटुंबासारखे आहेत.  भविष्यात या दोन हत्तींबरोबर काही दुर्घटना घडल्यास माझ्या कुटुंबातील कुठल्याच सदस्याला काहीही मिळणार नाही. आणि या हत्तींचा जीव वाचविण्यासाठी मी माझी सर्व संपत्ती त्यांच्या नावे केली आहे.

50 वर्षीय मोहम्मद अख्तर हे गेल्या 10 वर्षांपासून पत्नी व मुलापासून वेगळे राहत आहेत.  10 वर्षांपूर्वी कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नीने दोन मुले आणि एक मुलगी घेऊन घर सोडले होते.  आपला मोठा मुलगा मेराज चुकीच्या मार्गावर जाताना पाहून त्यांनी त्याला संपत्तीमधून हाकलून दिले.  तर अर्धी संपत्ती पत्नीच्या नावे  ठेवली आहे.  त्याचबरोबर ईतर मालमत्ता, शेत-धान्याचे कोठार, घर, बँकेतील शिल्लक ही  दोन्ही हत्तींच्या नावे करण्यात आली आहे.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post