लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा-महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन क्लासेस चालू  झाले आहेत.  यामुळे बर्‍याच वेळा मुलांना इंटरनेटच्या समस्येला सामोर जावं लागतं.  अशावेळी मुलं इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात.  अशीच एक घटना केरळमधील अरीक्कल येथे घडली एक बी.ए.  इंग्रजी ची विद्यार्थीनी  तिच्या घराच्या छपरावर बसून ऑनलाईन क्लास मध्ये  शिकताना दिसली.

नमिता नारायण असे या विद्यार्थ्यानीचे नाव असून ती कुट्टीपुरम येथील केएमसीटी आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये शिकत आहे.  नमिता म्हणते की,

"मी  छतावर गेले आणि मला तिथे नेटवर्क सापडले.  नेटवर्क नसल्यामुळे नमिताने बरीच मोबाईल नेटवर्क चे सीम वापरली पण त्याचा काही फायदा झाला नाही.  मग त्यांनी छतावर बसुन क्लास ला ऊपस्थित राहयचे ठरविले"

सोमवारी नमिताचे क्लास सुरू झाले.  सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नमिताने छत्री चा वापर करून क्लास केला आणि बुधवारी त्याच छत्रीने तिला ऊन्हापासुन वाचवले.

 नमिताचे वडील के.सी.  नारायणन कुट्टी कोट्टाक्कल Arya Vaidya Sala येथे नोकरीस आहेत आणि आई एम. जीजा मलप्पुरम मधील GMLP स्कूलमध्ये शिक्षिका आहेत.  नमिताला ह्यासाठी त्यांनीही पाठिंबा दर्शविला.  त्यांनी तर लोखंडी शिडी देखील बनवून घेतली जेणेकरुन नमीता शिडीचा वापर करून आरामात चढू-ऊतरू शकेल.नमिताची मोठी बहीण ही Vaidyaratnam P.S. Varier Ayurveda College मध्ये BMS च्या चौथ्या सत्रात शिकते ती म्हणाली,

"चांगल्या नेटवर्कसाठी  मलाही घराच्या कानाकोपर्यात फिरावे लागते."

नमिताचे वडील म्हणाले,

 त्यांनी आपल्या क्लासेससाठी अनेक डेटा ऑपरेटरांशी चर्चा, परंतु केबल कनेक्टिव्हिटी अभावी त्यांना चांगले डाटा कनेक्शन मिळू शकले नाही.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post