Avoid this things to cut onion


जर तुम्हाला नववीन पदार्थ खायला आवडत असतील आणि त्यातल्या त्यात कांदा हा तुमच्या खाण्यातील चवीचा महत्वाचा भाग असेल तर तुमच्या डोळ्यातुन कांदा कापताना बर्याच वेळा अश्रू वाहिले असतील.  कांद्याची चव जितकी जास्त चवदार असेल तेवढच ते कापताना तुम्हाला रडू येते.  पण, काही सोप्या गोष्टी कांदा कापताना तुम्ही केल्यातर तुम्ही न रडता कांदे कापू शकता.

कांदा कापताना अश्रू का येतात?

 कांदा कापताना केमीकल  रीएक्शन होते आणि एक गॅस बाहेर पडतो.  जेव्हा हा गॅस पाण्याच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याचे एसीड तयार होतो.  म्हणूनच आपल्या डोळ्यांची आग होयला सुरवात करतात.  कांदे कापण्यापूर्वी काही लहान उपाय करून आपण ही समस्या टाळू शकता.

1. कांदा थंड करून कापा.

 कांद्या पुर्ण साल काढावी.  त्यानंतर कांदा काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा.  आणि मग अर्ध्या तासानंतर कांदा कापून घ्या.  असे केल्यानस डोळ्यांना त्रास होणार नाही.  पण पाण्यात ठेवल्यामुळे कांदा चिकट होईल.  म्हणुन, कांदा कापताना काळजी घ्या.

2. कांदा कापताना व्हिनेगरचा देखील वापरू शकता
 
कांदा सोलून घ्या व व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये थोडा वेळ ठेवा.  असे केल्यानेही डोळ्यात अश्रू येणार नाहीत.

3. फ्रिज मध्ये ठेवल्यानंतर कांदा कापा

 कांद्याची साल काढून फ्रिजमध्ये काही वेळासाठी ठेवा.  नंतर कांदा कापून घ्या.  पण, ही पद्धत फार लोकप्रिय नाही कारण असे केल्याने फ्रीजमध्ये दुर्गंधी पसरते.

4. कांद्याचा वरचा भाग कापून टाका

 कांदे कापण्याची प्रत्येकाची स्वेगवेळी पद्धत आहे.  पण जर अगोदर कांद्याचा वरचा भाग कापून मग कांदा कापणे हा एक उत्तम मार्ग आहे.  वरचा भाग कापल्यानंतर कांदा कापणे खूप सोपे होईल.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post