१ जानेवारी १९५१ रोजी मुरूड -जंजिरा (महाराष्ट्र) येथे जन्मलेल्या नानाच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना ठाऊक नाहीत.  उदाहरणार्थ, नाट्य कलाकार नीलू उर्फ ​​निलकांती यांच्याशी लग्न करताना  नानांनी  फक्त 750 रुपये खर्च केले आहेत हे फारच थोड्या लोकांना ठाऊक असेल.  ही कहाणी स्वतः नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

नाटकात नीलूची भेट झाली.

 नाना म्हणाले, "मला लग्न करायचं नव्हत. म्हणून मी नाटकामध्ये सामील झालो. मी विचार केला कि जेव्हा मी नाटकात चांगले पैसे कमवेल आणि तेव्हा जर एखादी मुलगी लग्नाला तयार झाली तर मग विचार करू. निलुची आणि माझी  पहीली नाटकामध्ये भेट झालेल्या नीलूशी मी लग्न केलं."  ती खूप चांगली अभिनेत्री होती आणि ती ऊत्तम लेखक आहे.नीलू एका बँकेत ऑफिसर होती आणि महिन्यात 2500 रुपये कमवत होती. त्यावेळी मला प्रत्येक शो मध्ये 50 रुपये मिळायचे. मी महिन्यात 15 शो करायचो तर.  माझी कमाई 750 रुपये असायची. याचा अर्थ असा आहे की माझी आणि नीलूची एकुण कमाई महिन्याला 3250 रुपये होती, जे पुरेसे नव्हते. "

750 रुपयात लग्न केले

 नाना म्हणतात, "70 च्या दशकात 200 रुपयांत रेशन येत असत. त्यामुळे आमची खुप बचत झाली व्हायची. आम्ही लग्नासाठी 750 रुपये खर्च केले होते. आमच्याकडे जवळजवळ 24 रुपये शिल्लक होते, त्यात आम्ही गोल्डसॉट ( Soft Drink) खेरदी केली आणि पाहुण्यांना छाटीशी पार्टी दिली. लग्नानंतर आम्ही एका रात्रीसाठी पुण्याला गेलो. अरविंद देशपांडे (मित्र) यांनी आमच्यासाठी हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती

.
नीलू सिनेमापासून दूरच राहिली

 नाना पाटेकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांची पत्नी नीलू सिनेमापासून दूर राहिली.  ते म्हणतात, " तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता."  नानाच्या म्हणण्यानुसार, वाढत्या वयानुसार नीलूचे वजन वाढले आणि ती सिनेमापासून दूर गेली.  नीनाने असेही म्हटले आहे की त्यांनी नीलूला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता आणि स्वत:च  शरीर हे एक शस्त्र म्हणून वापरावे असे सांगितले होते.

नाना आपल्या पत्नी पासुन वेगळ राहतात.

 नाना पाटेकर हे पत्नी नीलूपासून वेगळे राहत आहेत.  तथापि, त्यांचा घटस्फोट झालेला नाही.  एका मुलाखतीत ते म्हणाले, "आम्ही दररोज भेटतो आणि एकमेकांची काळजी घेतो."  अशी बातमी आहे की जेव्हा नानाचे अफेअर मनीषा कोईराला बरोबर चालू होते.  आणि जेव्हा नीलूला हे कळले तेव्हा ती त्याला सोडून निघून गेली.  पण, नाना ह्या गोष्टीस नकार देतात.

 एका मुलाचा मृत्यू झाला आहे

 नाना पाटेकर यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे.  पण, त्यांचा मोठा मुलगा मल्हारच्या आधी जन्मला होता, त्याचा नंतर  मृत्यू झाला.  एका मुलाखतीत नानाने म्हटले होते की, “माझे लग्न वयाच्या 27 व्या वर्षी झाले होते. जेव्हा मी 28 वर्षांचा होतो तेव्हा मी माझे वडील गमावले आणि सुमारे अडीच वर्षांनंतर माझा पहिला मुलगा मरण पावला. त्या मुलाचा ओठ जन्मत:च तुटलेला होता आणि इतर बर्‍याच अडचणींचा सामना तो करत होता. "

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post