जेव्हा पासुन कोरोनाशी जगाचा सामना चालू झाला आहे, तेव्हापासुन या दोन-तीन गोष्टी  आपल्याला चांगल्याच समजल्या आहेत.

 - सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे, म्हणजे 2 मीटरची दुरी खूप महत्वाची आहे आणि जर आपण अधिक दुर राहु शकलात तर खुपच छान.

 - न विसरता सारखे साबणाने हात स्वच्छ करणे.

 - चेहरा  (चेहरा, नाक) न झाकता घराबाहेर पडू नका.

 परंतु अद्याप आपल्याला फेस मास्कचा वापर कसा करावा आणि त्यास योग्यप्रकारे कसे स्वच्छ करावे हे माहित नाही.  अशा परिस्थितीत एक कटाक्ष टाका आणि जाणून घ्या की आपल्याला खरोखर काय करण्याची आवश्यकता आहे.

1. सर्जिकल मास्क-  

जर तुम्ही  सर्जिकल मास्क वापरत असाल तक, तज्ञ म्हणतात की प्रत्येक तीन तासांनी तो बदलणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

 संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि पूर्व अँग्लिया विद्यापीठाचे वैद्यकीय प्राध्यापक पॉल हंटर म्हणतात की सर्जिकल मास्क एक प्रकारचा कागदाचा बनलेला असतो जो फक्त एक श्वास घेताच व्हायरस थांबविण्याची क्षमता गमावतो.

त्यांचे म्हणणे आहे की बरेच लोक ते धुतात किंवा विविध प्रकारच्या गोष्टींनी निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे सर्व व्यर्थ आहे.  सर्जिकल मास्कच्या मध्यभागी एक अशी सामग्री आहे जी विषाणूला सामोरे जाते.  परंतु कोणत्याही परिस्थितीत ते ओले, खराब होत असेल किंवा इकडे तिकडे हलत असेल तर मास्क 'निरुपयोगी' होतो.

2. N95 या FFP2 मास्क

हे मास्क धुतले जाऊ शकत नाहीत कारण त्यांचे फिल्टर धुण्यामुळे खराब होते.  म्हणुन, एकदा वापरल्यानंतर पुन्हा तो वापरू नये हा उत्तम मार्ग आहे.

 तसे, एन 95 सारखे मास्क आरोग्य कामगारांसाठी आहेत.  सीडीसीच्या नियमांनुसार, मास्कच्या कमतरते मुळे आरोग्य कर्मचारी जास्तीत जास्त 8 तास हे मास्क घालू शकतात.  जर त्ये एकाच प्रकारचा आजाराने ग्रासलेल्या रूग्णाला सारख तपासत असतील तर .  अशा परिस्थितीत, हे देखील महत्वाचे आहे की मास्क चेहर्यावर पूर्णपणे फिट असावा.

3. कापडाचे मास्क- 

WHO च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ह्या मास्क दिवसातून एकदा साबण किंवा डिटर्जेंटने धुवावे.

 तज्ञांचे म्हणणे आहे की 60 डिग्री तापमानात डिटर्जंटमध्ये धुणे चांगले.  हे इतर कपड्यां बरोबरही देखील धुतले जाऊ शकते.

 मास्क धुतल्यानंतर ते सुकविण्यासाठी ड्रायर वापरू शकता.  CDC च्या मते, सूर्य प्रकाशात ही तुम्ही हा मास्क सुकवू शकता.  जर्नल ऑफ़ इंफ़ेक्शियस डिज़ीज़ ह्या  प्रकाशित केलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की दिवसा कोवळ्या सूर्याच्या किरणांमधून निघणार्‍या अल्ट्राव्हायोलेट लाइटच्या संपर्कात आल्यानंतर 10 मिनिटात कोरोना विषाणूचे कण 90 टक्के निष्क्रिय होतात.

 या गोष्टी लक्षात ठेवा आणि घरीच रहा.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post