2020 चे पहिले 6 महिने अर्थातच भीती आणि धक्क्याने गेल परंतु आता येणार्या काळात आपल्याला सावधगिरीने आणि विचारपूर्वक दिवस घालवावे लागतील.
कोविड -१९ साथीच्या आजारामुळे सॅनिटायटेशन आणि डीसईन्फेक्षन या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी बनल्या आहेत. घरी असो, प्रवास करताना वाहनचा वापर करणे, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवणे आता “न्यू नॉर्मल” मानले जात आहे.
अशा परिस्थितीत या गोष्टी लक्षात ठेवाः
१) छोट्या पण महत्वाच्या गोष्टी
आपण बर्याचदा स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या गोष्टींची काळजी घेतो पण काही छोट्या गोषिटींकडे दुर्लक्ष होते. दरवाजाची हँडल्स, लाइट स्विचेस, टॉयलेट फ्लश, वॉशबेसिन टॅप्स, विशेषत: पाण्याचे नळ स्वच्छ ठेवणे.
२) भांडी साफ करणे
गरम पाण्याने भांडी धुवा. लक्षात ठेवा, आपण हातमोजे घालून त्यांना स्वच्छ केले पाहिजे आणि नंतर काम संपल्यानंतर, त्या हातमोजांना स्वच्छ धुवा आणि सुकवा.
3) हँड सॅनिटायझर्सचा वापर
हँड सॅनिटायझरला नेहमीच आग आणि दिव्यापासून दूर ठेवा. 6 वर्षाखालील मुलांना स्वत: ते वापरू देऊ नका. एक जबाबदार मोठा माणूस नेहमी त्यांच्या बरोबर ते वापरताना असु द्या.
4) साबण किंवा जंतुनाशक?
साबणाने आणि पाण्याने स्वच्छ केल्याने धूळ,आणि अस्वच्छ ठिकाणचे जंतु कमी होतात, तर जंतुनाशकांमुळे हे जंतू लगेच मरतात.
5) इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची सुरक्षा
आपण दररोज फोन, लॅपटॉप आणि टीव्ही किंवा एसी रिमोट सारखे बरेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरतो. त्यांची नियमित स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे, परंतु हे लक्षात ठेवा की आपण नेहमी स्वत:बरोबर कोरडे कापड ठेवावे. कारण निर्जंतुकिकरण केल्यानंतर कोरड्या कापडाने ते ताबडतोब स्वच्छ करता येईल जेणेकरून गॅझेटमध्ये कोणताही लिक्वड जाणार नाही.
7) धुण्याचे भांडे
आपण आंघोळ करतो आणि मशिनमध्ये कपडेही धुतो परंतु ज्या भांड्यामध्ये कपडे साफ केले जातात त्यांनाही साफ करणे महत्वाचे आहे. प्रत्येक दुसर्या-तिसर्या दिवशी एकदा ही टोपली रिकामी करुन ती स्वच्छ करा.
या गोष्टी बहुदा सामान्य आहेत पण अत्यंत महत्वाच्या आहेत. यावेळी, आपल्या सर्वांची सुरक्षा आपल्या स्वत: च्या हातात आहे. जर आपल्याला एखादी प्रोफेशनल सेवा हवी असेल तर या गोष्टींची काळजी घ्या.
Post a Comment
कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .