www.marathiiq.com

सुमारे 40 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून बेपत्ता झालेली महीला तिच्या कुटुूंबाला पुन्हा मिळाली आहे.  ह्याचे पुर्ण श्रेय इंटरनेट ला जाते, ईंटरनेटच्या मदतीने ही महिला वयाच्या 94 व्या वर्षी आपल्या कुटुंबास शोधू शकली.

 वास्तविक, पंचूबाई नावाची ही महिला 1979-80 मध्ये बेपत्ता झाली होती.  त्यावेळी तीचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. इंटरनेटच्या मदतीने तिला तीचे घर शोधण्यात यशस्वी झाली.  पण खेदजनक गोष्ट ही की जेव्हा ती तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिला आपल्या मुलाला भेटता आले नाही.  कारण 3 वर्षांपूर्वी तीच्या मुलाचा मृत्यू झाला.

पंचूबाई बेपत्ता झाली तेव्हा तिचा नवरा तिला डॉक्टरांकडे ऊपचारासाठी नागपुरात घेऊन गेला होता.  तेथून ती अचानक एक दिवस गायब झाली. मध्य प्रदेशचे ट्रक चालक इसरार खान यांचे वडील यांना महामार्गावर ही अजारी महीला चालताना दिसली.  पंचूबाईची प्रकृती खूपच वाईट होती तेव्हा तिलाही मधमाश्यांनी ही चावले होते.  खूप विचारपुस करूनही तिला घरचा पत्ता सांगता आला नाही.

www.marathiiq.comत्यानंतर इसरार च्या वडिलांनी त्यांना आपल्याबरोबर मध्य पर्देशला आणले.  ती त्यांच्या कुटूंबासह राहू लागली.  काही दिवसांनी ती बरी झाल्यावर ती मराठीत बोलू लागली.  कोणालाही लवकर तीची भाषा समजू शकली नाही.  ती तेथे 40 वर्षे राहिली.  खान साहिब आणि त्याच्या कुटुंबीयांनी तीची आईप्रमाणेच काळजी घेतली.

लॉकडाऊन दरम्यान, इसरारने पुन्हा तीला तीच्या घराबद्दल विचारले.  यावेळी आजीने परसार पुर आणि खांजमाचे नाव घेतले.  जेव्हा गुगल मॅपवर शोध घेतला गेला, तेव्हा परसार पुर स्थान महाराष्ट्रात दिसून आले.  त्यानंतर इसरार तेथे राहणार्या त्याच्या एका मित्राला संपर्क केला.  त्याने अभिषेकला फोनवर सर्व गोष्टी सांगितल्या.  अभिषेकने आपल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्या  आजीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.

या गृपमधील  काही लोक खेंजमा या गावचेही होते.  त्यांच्या नातेवाईकांनी आजीला ओळखले.  हरवलेल्या आजीचा शोध घेत असलेला त्यांचा नातू भैय्यालाल ह्यांना खूप आनंद झाला.  परंतु लॉकडाऊनमुळे तो त्यांना घरी आणू शकला नाही.  17 जून रोजी भैय्यालाल अभिषेकच्या मदतीने इसारारच्या घरी पोहोचला.

आणि दुसर्‍याच दिवशी तो आजीला घेऊन घरी आला.  आजीच्या आगमनाने त्यांचे कुटुंब खूप आनंदित आहे आणि त्यांनी खान परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post