No ambulance found 75-year-old grandfather took his wife home on a bicycle


स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर आपण स्वतःसाठी काय शोधले आहे? उत्तर अगदी सोपे आहे, आपण  लोकशाही प्रणालीचा भार स्वतःवर घेतला आहे . होय, हा तोच भार आहे जो  आपण  प्रथम आपल्या निवडून दिलेल्या  नेत्यांवर  टाकला  आणि मग तोच  नेता आपल्या डोक्यावर कधी चढला  हे आप्ल्यायला  कळले नाही. आता आपल्याला दुहेरी ओझे घेऊन जीवनाची गाडी ओढण्यास  करण्यास भाग पाडले जात आहे.

आता हेच  बघा, ज्या देशात एक आमदार  दहा वाहनांचा काफिला घेऊन घरा बाहेर पडतो , त्या देशातील ७५ वर्षांच्या पुरुषाकडे आपल्या आजारी पत्नी नेण्यासाठी  साधं  वाहनही नाहि . नाईलाजाने  तो बायकोला कपड्यांच्या बॅगमध्ये सायकल वर बांधून  ८० किमी दूर आपल्या गावी घेऊन निघतो.

ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील आहे. 75 वर्षीय पूरनलाल यांची पत्नी मोहन बाई अर्धांगवायूने ​​ग्रस्त आहेत.तेथील तो एका रुग्णालयात पत्नीला उपचारासाठी घेऊन आला. पण दुर्दैव  त्यांना परत जाण्यासाठी कोणतेही वाहन भेटले नाही. त्यांना जिल्हा रुग्णालयातूनहि त्यांना  कोणतेही मदत झाली  नाही. अशा परिस्थितीत त्याने बायकोला सायकलने घरी नेण्याचा निर्णय घेतला.

नवभारत च्या रिपोर्ट नुसार पूरनलाल यांनी कपड्यांची बॅग बनवून सायकलवर लटकविली. त्यात पत्नीला ठेवल्यानंतर ते 80 किमी अंतरावर बामोरी गावी गेले. भोपाळ ते नरसिंगपूर ह्या मार्गाने जाणाऱ्या  एक कॉंग्रेसचे नेत्याची त्यांच्यावर नजर गेली  तोपर्यंत  पूरनलाल यांनी सायकलवरून सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यानंतर, त्या नेत्याने त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली गेली. 

ही परिस्थिती केवळ मध्य प्रदेशातच नाही, तर देशातील बर्‍याच भागात आहे. सरकारने कितीही दवे केले तरी  जमिनीवरचे वास्तव भयानक आहे. निवडणूक लढविण्यासाठी, आम्ही हजारो एलईडी स्क्रिन  लावून काही दिवसांत वर्चुअल रॅलीची व्यवस्था करू शकतो, परंतु वर्षानुवर्षे रुग्णवाहिकेसारख्या आवश्यक आणि मूलभूत गोष्टींची व्यवस्था करण्यात आपण  असक्षम आहोत. आपल्या देशाच्या व्यवस्थेचं  सर्वोत्तम सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणारे उदाहरण जगात कुठेही सापडणार नाही.

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post